त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : ओझर विमानतळाला त्रंबकेश्वराचे नाव द्यावे, अशी जोरदार मागणी त्रंबकेश्वरच्या साधू महतांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज व निरंजनी आखाड्याचे ठाणापती धनंजय गिरी महाराज यांनी हा ठराव मांडला.
आसाम सरकारने भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. यावर साधू महंतांनी आसाम सरकारवर नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगे रेल्वे आणि बसने जोडली जावीत, पाच ज्योतिर्लिंगांची रक्षण व्हावे. असे सांगितले.
अष्टविनायक, चारधाम यात्रा जोडणाऱ्या बसेस असून त्याच धर्तीवर राज्यातील पाच ज्योतिर्लिंगे भाविक प्रवाशांसाठी जोडली जावीत. रेल्वेने जोडा अथवा बसने जोडा पण दळणवळणाची सुविधा भाविकांना उपलब्ध करून द्या. अशी मागणी या बैठकीत व्यक्त करण्यात आली. साधूंचे महाशिवरात्र पर्वस्नान या बैठकीनंतर साधू प्रतिनिधी बोलत होते.
यावेळी जुना आखाड्याचे शिवगिरी महाराज तसेच कार्यकर्ते शामराव गंगापुत्र, साधू महंत आखाडा प्रमुख महंत उपस्थित होते.
दरम्यान महाराष्ट्रातील पाचव्या ज्योतिर्लिंगाच्या स्थानाचा विकास व्हावा, कॅरीडॉर करावा, अशीही मागणी, श्रीराम शक्ती पिठाचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केली. पंतप्रधान मोदी सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करत असल्याने त्र्यंबकेश्वरसह या पाचही ज्योतिर्लिंगाकडे शासन लक्ष घालेले, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.