Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीमहाशिवरात्रीचा आरोग्यदायी दृष्टिकोन- वाचा बेल आणि कवठाचे फायदे

महाशिवरात्रीचा आरोग्यदायी दृष्टिकोन- वाचा बेल आणि कवठाचे फायदे

मुंबई: उद्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होईल. आपल्या प्रत्येक सण, उत्सवामधून आरोग्याचे महत्त्व उत्तम पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाशिवरात्री साजरी करताना शिवाला अर्पण केल्या जाणाऱ्या बेलाच्या पानांचे, बेलाच्या झाडाचे महत्त्व मोठे आहे. बेलासोबतच कवठाचा रस पिणे आदी गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याला धार्मिकतेबरोबरच सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्तततेचा आधारही आहे.

आरोग्यदायी दृष्टिकोन

हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या प्रारंभीच महाशिवरात्री येते. या काळात वातावरणातील गारठा कमी होऊन उष्णता वाढू लागल्यामुळे कफदोष निर्माण होऊ शकतो. विशेषत: श्वसनमार्गाच्या तक्रारी वाढतात. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखे आजार वाढू लागतात. भूकही मंदावते. या सर्वांवर बेलफळ आणि कवठ ही फळे उपयुक्त ठरतात. त्यामुळेच त्यांचे पदार्थ आहारात घेणे हा आरोग्यदायी दृष्टिकोन आहे.

फायदेशीर कवठ

कवठाचे फळ पचनासाठी उत्तम व आरोग्यवर्धक असून आतड्यातील कृमी व अतिसारावर उपयोगी आहे. तसेच मूळव्याध, पोटातील अल्सर, रक्तशुद्धीसाठी फायदेशीर आहे. गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी कवठाचा गर उपयोगी पडतो. कवठाच्या झाडाची साल हृदय धडधडणे आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयोगी आहे. कवठाचा डिंक मधुमेहावरील उपचारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कवठाच्या बाह्य आवरणापासून सुगंधी तेल, अत्तर व कपड्याचे रंग बनवितात.

कवठाच्या झाडापासून जो डिंक मिळतो त्याला प्रक्रिया उद्योगातही मोठी मागणी आहे. अरेबिक डिंकाला पर्याय म्हणून त्याचा वापर वाढू लागलेला आहे.

बेलाचे त्रिदलरस सेवन

बेल वाहताना सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण शिवाला अर्पण करण्याची धार्मिक भावना असली, तरी आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरस सेवनाला महत्त्व आहे. पोटाचे विकार, पोटफुगी, गॅसेस दूर करण्यासाठी बेलफळाच्या गराचे सरबत उपयुक्त ठरते. महिलांच्या पाळीचे विकार, गर्भाशयाला येणारी सूज, बाळंतपणातील विकारांवरही बेलफळ उपयुक्त आहे. रक्तातील साखर कमी करण्याच्या गुणामुळे बेलाच्या पानांचा ताजा रस मधुमेहावर अत्यंत रामबाण ठरतो.

बेलफळावर प्रक्रिया करून विविध प्रकारची उत्पादने आता तयार होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बेलाचा रस, पेय, मुरांबा, बेलाची पोळी, चूर्ण, जेली, वडी आदी उत्पादनांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -