१२ वर्षांच्या एका मुलाचा होरपळून मृत्यू
मुंबई : मालाडमधील कुरार व्हिलेज येथील अप्पा पाडा परिसरातील वन खात्याच्या हद्दीतील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीत शंभरहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.
मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर प्रेम तुकाराम बोरे नावाच्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतल्या एका घरात गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने आग लागली आणि तेथून ती सगळीकडे पसरली, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.