मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई महापालिकेसाठी २९.९६ टक्के मतदान झाले आहे. हळू हळू मतदानाचा जोर वाढू लागला आहे.


निवडणूक कोणतीही असू दे मुंबईत संध्याकाळी शेवटच्या दोन तासांमध्ये मतदान अनेकदा वाढते. यामुळे यंदाच्या मनपा निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ही किती टक्क्यांनी वाढणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.


सकाळच्या सत्रात मुंबईतल्या अनेक उच्चभ्रू लोकवस्तींमधील मतदार बाहेर पडले नव्हते. यामुळे मतदान नक्की कोणाच्या बाजूने होणार यावरुन तर्कवितर्क सुरू होते. पण हळू हळू मतदान वाढू लागले. मुंबईतल्या वेगवेगळ्या समाजातले मतदार मतदानासाठी बाहेर पडू लागले आहेत. मतदान वाढू लागले आहे.


मतदानाची टक्केवारी वाढू लागली असतानाच विरोधकांनी निवडणूक आयोगाकडून मतदान केलेल्यांच्या बोटाला लावली जाणारी शाई पुसली जाते असा आरोप करायला सुरुवात केली. यावर निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून उत्तर दिले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही. याची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्याचे नोंद झालेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून पुन्हा मतदान करता येत नाही. मतदाराच्या बोटाला मार्कर पेनद्वारे शाई लावण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी जारी केला आहे. तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला मार्कर पेनद्वारे शाई लावली जात आहे. ही शाई बोटाला लावताना नख तसेच बोटाच्या वरच्या बाजूस त्वचेवर तीन ते चार वेळा पेन घासून शाई लावण्याचे निर्देश आहेत.


निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांच्या आरोपातली हवाच काढून घेतली आहे. यानंतर विरोधकांची बोलती बंद झाली आहे.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिघांना अटक, परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांमध्ये संताप

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या

Ketan Agrawal Murder Case : क्रिकेटचं मैदान ते हत्येचा कट; २००० कॉल्स, २३८ तास संवाद अन् सिया-चेतनच्या अफेअरची 'इनसाईड स्टोरी' उघड!

पुणे : पुण्याजवळील लोहगड किल्ल्याच्या भयावह दरीत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाला ढकलून दिलेल्या प्रकरणाचा तपास

BMC Schools : जेम पोर्टलमुळे शालेय वस्तू खरेदीला विलंब नाही, महापालिका प्रशासनाने केली भूमिका स्पष्ट

वह्या, पुस्तकांच्या वजनानुसार मुलांना दप्तरे द्या तब्बल दोन वर्षांतील ४३ कोटी रुपयांची झाली बचत मुंबई : मुंबई

BMC : इतर प्राधिकरणांच्याा जमिनीवर विकासकामे करताना अडचणींचा डोंगर

अतिरिक्त आयुक्तांनी दिला समन्वय राखण्याचा सूचना मुंबई : मुंबईतील (Mumbai) विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आरोग्य

Mahim Crime : धक्कादायक! मोबाईलच्या किरकोळ वादावरून थेट चाकूचे सपासप वार; माहिम स्टेशनबाहेर तरुणावर हल्ला

मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

BMC News : महापालिका सभागृह आता भरणार दर सोमवारी आणि गुरुवारी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू