'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. परंतु, मुंबईत कोणाचाही महापौर झाला, तरी भोंग्यांना कदापी परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एनएनआय’ वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उबाठाच्या बेगडी हिंदुत्वावर कठोर शब्दांत टीका केली.
फडणवीस म्हणाले, मशिदींवरील भोंगे काढले पाहिजेत, ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यांनी या संदर्भात स्पष्ट मागणी केली होती आणि सर्वोच्च न्यायालयानेही यावर निर्णय दिला आहे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कोणतीही जोरजबरदस्ती न करता, सामंजस्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समजावून सांगत भोंगे काढले होते. परंतु, निवडणूक जिंकण्यासाठी आता पुन्हा लाऊडस्पीकर लावण्याचे वचन दिले जात असेल, तर उद्धव ठाकरेंनी त्याचे उत्तर दिले पाहिजे. ‘आम्हाला निवडून द्या, आम्ही भोंगे परत लावू’ असा प्रचार करणे, यापेक्षा मोठे लांगुलचालन काय असू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई


ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असतील तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनाही तेच अपेक्षित होते. मात्र हा प्रीतीसंगम नसून भीतीसंगम आहे. दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र आले आहेत,” असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला.
Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.