स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पावसाळ्यानंतर?

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी १४ मार्च पर्यंत पुढे ढकलली आहे. आधी कोर्टाच्या वेबसाईटवर २१ मार्च तारीख दाखवली जात होती. परंतु आता सुनावणी १४ मार्चला होणार आहे.


यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. राज्यातील २७ महानगरपालिकांपैकी २३ महापालिकेची मुदत याआधीच संपलेली असून उर्वरित ४ महापालिका यामध्ये सांगली-मिरज महापालिकेची मुदत १९ ऑगस्ट २०२३ रोजी, जळगाव महापालिकेची मुदत १७ सप्टेंबर २०२३ रोजी, अहमदनगर महापालिकेची मुदत २७ डिसेंबर २०२३ रोजी तर धुळे महापालिकेची मुदत ३० डिसेंबर २०२३ रोजी संपणार आहे.



महाराष्ट्रातील खालील २३ महापालिकांची मुदत संपली आहे...


१) मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली आहे. महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.


२) ठाणे महापालिकेची मुदत ५ मे २०२२ रोजी संपली आहे.


३) नवी मुंबई महापालिकेची मुदत ८ मे २०२० रोजी संपली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.


४) कल्याण-डोंबिवली महापालिकेची मुदत १० नोव्हेंबर २०२० रोजी संपली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.


५) पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे.


६) पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे.


७) नाशिक महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे.


८) औरंगाबाद महापालिकेची मुदत २८ एप्रिल २०२० रोजी संपली आहे.


९) नागपूर महापालिकेची मुदत ४ मार्च २०२२ रोजी संपली आहे.


१०) पनवेल महापालिकेची मुदत ९ जुलै २०२२ रोजी संपली आहे.


११) वसई-विरार महापालिका मुदत २७ जून २०२० रोजी संपली आहे.


१२) कोल्हापूर महापालिका मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली आहे.


१३) भिवंडी-निजामपूर महापालिका मुदत ८ जून २०२२ रोजी संपली आहे.


१४) उल्हासनगर महापालिका मुदत ४ एप्रिल २०२१ रोजी संपली आहे.


१५) मीरा-भाईंदर महापालिका मुदत २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपली आहे.


१६) नांदेड महापालिका मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संपली आहे.


१७) सोलापूर महापालिका मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली आहे.


१८) परभणी महापालिका - १५ मे २०२२ रोजी संपली आहे.


१९) अमरावती महापालिका मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली आहे.


२०) चंद्रपूर महापालिका मुदत २८ मे २०२२ रोजी संपली आहे.


२१) अकोला महापालिका मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली आहे.


२२) मालेगाव महापालिका मुदत १३ जून २०२२ रोजी संपली आहे.


२३) लातूर महापालिका मुदत २१ मे २०२२ रोजी संपली आहे.


२४) अहमदनगर महापालिका - २७ डिसेंबर २०२३ रोजी मुदत संपणार.


२५) धुळे महापालिका - ३० डिसेंबर २०२३ रोजी मुदत संपणार.


२६) जळगाव महापालिका - १७ सप्टेंबर २०२३ रोजी मुदत संपणार.


२७) सांगली-मिरज महापालिका - १९ ऑगस्ट २०२३ रोजी मुदत संपणार.

Comments
Add Comment

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू

CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर