चॅट जीपीटीनंतर आता गीता जीपीटी! मिळणार तुमच्या समस्यांची उत्तरे

मुंबई: तुम्हाला चॅट जीपीटी माहिती असेल पण तुम्हाला गीता जीपीटी माहितेय का? होय आता गीता तत्वज्ञान एआय चॅटबॉटवर मिळणार आहे. तुमच्या दैनंदिन समस्यांवर आता तुम्ही या एआय चॅटबॉटद्वारे "भगवद्गीतेचा सल्ला" घेऊ शकाल. म्हणजेच, जसे तुम्ही चॅट जीपीटी प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारता तसे गीता जीपीटीवरही विचारु शकता. त्याचे उत्तर एआय चॅटबॉट भगवद्गीतेचा सल्ला घेऊन देईल.


गुगलचे सॉफ्टवेअर इंजिनियर बंगळुरूस्थित सुकुरु साई विनीत यांनी हे गीता जीपीटी विकसित केले आहे. गीता जीपीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट जीपीटी-३ द्वारे तुमच्या जीवनातील समस्यांना थेट भगवद्गीते मधून उत्तर देते. हा चॅटबॉट जीवनातील बहुतेक समस्यांची उत्तरे देतो आणि त्या कशा सोडवता येतील हे देखील सांगते. परंतु, तुम्ही एलोन मस्क किंवा बिल गेट्सबद्दल विचारल्यास, चॅटबॉटला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण जाईल.





स्टार्ट अपही सरसावले


चॅट जीपीटी लाँच झाल्यापासून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅटबॉटची लढाई तीव्र झाली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या टेक कंपन्यांनी देखील त्यांचे स्वतःचे एआय चॅटबॉट्स सादर केले आहेत.


सध्या केवळ मोठ्या टेक कंपन्याच नाहीत तर स्टार्ट-अप आणि डेव्हलपर देखील या तंत्रज्ञानावर काम करत आहेत आणि एआय चॅटबॉट्स विकसित करण्याचा विचार करत आहेत.

Comments
Add Comment

अहमदाबादमध्ये आज भारत - द. आफ्रिका निर्णायक लढत

गिल दुखापतग्रस्त, संजू सॅमसनला संधी?; सूर्याच्या फॉर्मने वाढवली संघाची चिंता अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका

मध्यरात्री झोपेतच विद्यार्थ्यांचे केस आणि भुवया कापल्या!

चास आश्रमशाळेतील प्रकार मोखाडा : मोखाडा तालुक्यातील चास आश्रमशाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत घडलेल्या

कर्जत - पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू होणार

३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचे काम पूर्ण राहुल देशमुख कर्जत : कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू

ठाण्यातील 'नमो ग्रँड सेंट्रल पार्क'ला आंतरराष्ट्रीय मान्यता

‘सार्वजनिक लँडस्केप’ श्रेणीत’ बेस्ट ऑफ द बेस्ट’ पुरस्कारावर मोहर ठाणे : ठाण्यातील नमो ग्रँड सेंट्रल पार्कला

मुंबई विमानतळावर विक्रमी प्रवासी वाहतूक

नोव्हेंबर २०२५ मध्ये गाठला प्रवाशांचा विक्रमी टप्पा मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र