- संजय भुवड
महाड : महाड एमआयडीसीमधील मल्लक स्पेशालिटी कंपनीत आज सकाळी भीषण आग लागली. आगीनंतर या कंपनीत अनेक मोठे स्फोट झाल्याने या आगीचा भडका उडून परिसरात घबराट निर्माण झाली. कंपनीमधील स्फोटाने संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरले. या स्फोटांचे तीन किलोमीटर लांब असलेल्या नडगाव हद्दीतील इमारतीलाही हादरे बसले.
कंपनीच्या इओ प्लान्टमध्ये आज सकाळी अचानक आग लागली. आगीनंतर कंपनीत असलेल्या केमिकलच्या ड्रमचे स्फोट होऊ लागले. त्यामुळे आगीचे मोठे लोळ दिसू लागले होते. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र सुरक्षा रक्षकांना किरकोळ दुखापत झाली आहे. अग्नीशमन दल घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे.