मुंबई: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या अडचणींत वाढ होणार आहे. विनोद कांबळी यांच्यावर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याची पत्नी अँड्रिया यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
वादग्रस्त माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून आर्थिक संकटात असल्याचे म्हटले आहे. काल त्याने आपल्या पत्नीला मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्याची अँड्रिया हिने आपल्या तक्रारीत पती विनोद कांबळी याने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
विनोद कांबळी याने स्वयंपाकघरातील एक भांडे आपल्या अंगावर फेकले, असा आरोप अँड्रियाने केला आहे. या मारहाणीत अँड्रिया यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.