अंबरनाथ येथील बहुल वस्तीचा लवकरच कायापालट

अंबरनाथ:  अंबरनाथ मतदार संघातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रातील विकास कामांकरिता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नांतून अल्पसंख्याक विभागाच्या बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


अंबरनाथ पश्चिम येथील प्रभाग क्र.२८ उलन चाळ बसेरा, बटीयार खाना पासून ते जहीर शेख यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, उलनचाळ मधील युसुफ शेख यांच्या घरापासून रफिकलाला यांच्या घरापर्यंत पायवाट तयार करणे. प्रभाग क्र.२३ मधील मदनसिंग गार्डनच्या बाजूची पत्राचाळ जवळील ड्रेनेज लाईन व गटार लाईनचे नूतनीकरण करणे आणि प्रभाग क्र.२१ मधील डी.एम.सी.न्यू. कॉलनी वुळन चाळ परिसर ते संदीप मांजरेकर यांच्या घरापासून प्रिन्स अपार्टमेंट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच उल्हासनगर - ५ येथील पॅनल क्र.१९ मधील क्रांती नगर, इंदिरा नगर विठ्ठल नगर आणि नेहरू नगर येथे सी.सी.रस्ता व गटार बनविणे, पॅनल क्र.२० मधील पटेल नगर येथील मस्जिद जवळ सी.सी.पायवाटा व गटार बनविणे इत्यादी विकास कामे करण्यात येणार आहेत. या विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मतदार संघातील नागरीकांच्या वतीने आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पास्थळ महोत्सव २०२५

'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,