मेटाची अँटी स्कॅम मोहीम

मुंबई : 'मेटा अँटी-स्कॅम' (Meta Anti-Scam) हा मेटा कंपनीचा (Facebook, WhatsApp, Instagram) ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून वापरकर्त्यांना (युझर) वाचवण्यासाठीचा एक उपक्रम आहे. भारतात मेटाने भारत सरकार आणि SEBI सोबत मिळून 'स्कॅम से बचो' (Scam Se Bacho) ही मोहीम सुरू केली आहे. मेटाने नीना गुप्ता आणि आयुष्मान खुराना या कलाकारांच्या मदतीने या मोहिमेद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


मेटाने दिलेले महत्त्वाचे अँटी-स्कॅम फीचर्स:




  1. व्हॉट्सॲप स्क्रीन-शेअरिंग अलर्ट: व्हिडिओ कॉल दरम्यान अनोळखी व्यक्तीसोबत स्क्रीन शेअर करण्याचा प्रयत्न केल्यास व्हॉट्सॲप आता युजर्सना चेतावणी (Warning) देते, जेणेकरून तुमचे बँकिंग डिटेल्स किंवा OTP चोरीला जाऊ नयेत.

  2. मेसेंजर एआय स्कॅम डिटेक्शन: मेसेंजरवर नवीन व्यक्तीकडून संशयास्पद संदेश आल्यास, मेटाची AI सिस्टीम युजरला अलर्ट करते आणि तो मेसेज ब्लॉक किंवा रिपोर्ट करण्याचा पर्याय देते.

  3. पासकी (Passkeys): पासवर्डऐवजी फिंगरप्रिंट, फेस लॉक किंवा पिन वापरून लॉग-इन करण्याची सुविधा दिली आहे, ज्यामुळे अकाउंट हॅक होण्याचा धोका कमी होतो.

  4. सुरक्षा तपासणी (Security Checkup): फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमचे अकाउंट सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी 'सिक्युरिटी चेकअप' टूल उपलब्ध आहे.

  5. अनोळखी ग्रुप्सपासून संरक्षण: व्हॉट्सॲपवर तुम्हाला अनोळखी व्यक्तींनी ग्रुपमध्ये ॲड करू नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये बदल करता येतात.

  6. स्कॅमपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स:
    थांबा आणि विचार करा: कोणत्याही घाईच्या किंवा फायद्याच्या मेसेजला लगेच प्रतिसाद देऊ नका.
    माहिती शेअर करू नका: तुमचा OTP, पासवर्ड किंवा बँकेची माहिती कधीही कोणालाही सांगू नका.
    रिपोर्ट करा: कोणताही संशयास्पद मेसेज किंवा जाहिरात दिसल्यास Meta Help Center वर त्वरित रिपोर्ट करा.


'मेटा अँटी-स्कॅम' मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात नीना गुप्‍ता यांच्‍यासह लोकप्रिय क्रिएटर्स सुकृती चतुर्वेदी, युवराज दुआ आणि श्रेयस मेंदिरत्ता असलेल्‍या या जाहिरातीमध्‍ये वास्‍तविक जीवनातील प्रसंग आणि दैनंदिन संवादांना दाखवण्‍यात आले आहे, ज्‍यामधून अनेक ऑनवलाइन घोटाळेबाज खोटी तत्‍परता, अधिकार किंवा विश्वास दाखवत करणाऱ्या ऑनलाइन घोटाळ्यांना निदर्शनास आणण्‍यात आले आहे. ही मोहिम व्‍यक्‍तींना स्‍वत:च्‍या व इतरांच्‍या संरक्षणासाठी कोणतीही कृती करण्‍यापूर्वी प्रश्‍न विचारण्‍याचे, उपलब्‍ध सुरक्षितता साधनांचा वापर करण्‍याचे आणि यंत्रणांकडे झालेल्‍या फसवणूकीची तक्रार करण्‍याचे आवाहन करते.


मेटासोबत सहयोगाने घोटाळ्यांबाबत जागरूकतेला चालना देण्‍याची गरज व्‍यक्‍त करत सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्‍चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चे अध्‍यक्ष श्री. तुहिन कांता पांडे म्‍हणाले, ''मोठ्या प्रमाणात डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍सचा वापर करत आर्थिक घोटाळे करण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली आहे, जेथे कायदेशीर खोटे दावे आणि मोठ्या प्रमाणात परतावा देण्‍याचे खोटे आश्वासन देत लोकांची दिशाभूल केली जात आहे. नागरिकांनी याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे आणि आर्थिक गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्‍यापूर्वी सेबी-नोंदणीकृत कंपन्‍यांशी संपर्क साधला जात असल्‍याची खात्री घेतली पाहिजे. मेटाची अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिम आर्थिक फसवणूकीच्‍या वाढत्‍या प्रमाणादरम्‍यान लोकांमध्‍ये जागरूकतेचा अधिकाधिक प्रसार करण्‍यासाठी महत्त्वाची आहे. यासारखे जनजागृती करणारे उपक्रम अशा फसवणूकांचा प्रभाव कमी करण्‍यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित व लोकांनी मेहनतीने कमावलेल्‍या पैशाचे संरक्षण करण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत.


या मोहिमेसोबत सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत अभिनेत्री नीना गुप्‍ता म्‍हणाल्‍या, मला मेटाच्‍या अॅण्‍टी-स्‍कॅम उपक्रमाला पाठिंबा देण्‍याचा अभिमान वाटतो, कारण ऑनलाइन घोटाळ्यांपासून स्‍वत:चे व प्रियजनांचे संरक्षण करण्‍यासाठी जागरूकता हे पहिले पाऊल आहे. ही माहितीपूर्ण जाहिरात व्‍यक्‍तींना कोणतीही कृती करण्‍यापूर्वी थांबून विचार करण्‍याची, प्रश्‍न विचारण्‍याची आणि सत्‍यापन करण्‍याची आठवण करून देते, तसेच मेटाच्‍या सेफ्टी टूल्‍सचा वापर करण्‍याची आठवण करू देते, जे तुम्‍हाला तुमच्‍या सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. मी आशा करते की हा संदेश भारतातील लाखो व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचेल, तसेच लोकांना संशयास्‍पद स्थितींचा सामना करताना अधिक आत्‍मविश्वास व सुसज्‍ज असल्‍याचे वाटण्‍यास मदत होईल.


स्‍कॅम से बचो मोहिमेच्‍या नवीन एडिशनच्‍या माध्‍यमातून मेटा डिजिटल सुरक्षिततेबाबत माहिती सहजसाध्य, सर्वसमावेशक व कृतीशील करण्‍यासाठी क्रिएटर्स आणि सरकारी भागधारकांसोबत सक्रियपणे सहयोग करत आहे. या मोहिमेमधून घोटाळ्यांबाबत तक्रार करण्‍याच्‍या महत्त्वाला देखील सादर करण्‍यात आले आहे, तसेच वापरकर्त्‍यांना फसवणूक झाल्‍यास राष्‍ट्रीय सायबरक्राइम हेल्‍पलाइन १९३० वर संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Smart Fashion Hacks : महागडे कपडे न घेता स्टायलिश दिसायचंय? फॉलो करा 'या' स्मार्ट फॅशन हॅक्स

तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते.

Nashik Crime News : गणेशच्या आत्महत्येचा उलगडा होणार, सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातील परिसरातील गणेश भिका गायकवाड (Ganesh Bhika Gaikwad) या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली

Dhule News : लॉजमध्ये नको ते कृत्य ! तरुण-तरुणी रंगेहाथ ताब्यात, शहरात खळबळ

Dhule News : धुळे शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका लॉजवर पोलिसांची मोठी कारवाई

Fashion Tips: तुमचा ड्रेसिंग सेन्स बोरिंग वाटतोय? वॉर्डरोबमध्ये ॲड करा 'या' गोष्टी; तुमची पर्सनालिटी एका क्षणात बदलेल

तुमचा ड्रेसिंग सेन्स नेहमीसारखाच वाटत असेल, तर संपूर्ण वॉर्डरोब बदलण्याची गरज नाही. योग्य अॅक्सेसरीज, स्टायलिश

Jeans Styling Tips : प्रत्येक मुलीने ट्राय करावेत जीन्ससोबतचे 'हे' ८ स्टायलिश टॉप्स

बेसिक व्हाईट टी-शर्ट (Basic White T-Shirt) https://prahaar.in/2026/07/19/want-to-look-stylish-then-definitely-try-these-trendy-skirts/ ब्लू किंवा ब्लॅक जीन्ससोबत साधा व्हाईट टी-शर्ट

Nashik : खाकीला डाग ! 10 हजारांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार रंगेहात ताब्यात

Nashik : खाकीला काळीमा लावण्याचे काम नाशिकमधील दोन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात