पाकिस्तानचा नेदरलँडवर निसटता विजय, फहीम अश्रफ ठरला तारणहार

कोलंबो   : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात फहीम अश्रफच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने नेदरलँडचे आव्हान ३ गडी राखून मोडीत काढले. ११४ धावांवर ७ गडी गमावलेला पाकिस्तान संघ संकटात असताना फहीमने केवळ ११ चेंडूत २९ धावा कुटून पाकिस्तानला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.


प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडची सुरुवात आक्रमक झाली. मायकल लेविटने (२४) डावाला गती दिली, तर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (३७) आणि बास डी लीडे (३०) यांनी मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी सामन्यावर नियंत्रण मिळवले. अबरार अहमद (२/२३) आणि सईम अयुब (२/७) यांनी मधल्या फळीला धक्के दिले, तर सलमान मिर्झाने (३/२४) तळाच्या फलंदाजांना बाद करून नेदरलँडचा डाव १४७ धावांवर रोखला.


१४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर साहिबजादा फरहानने (४७ धावा, ३१ चेंडू) एका बाजूने किल्ला लढवला. मात्र, ९८ धावांवर फरहान बाद झाला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. बाबर आझम (१५) आणि शादाब खान (८) स्वस्तात परतल्याने पाकिस्तानची अवस्था ७ बाद ११४ अशी अत्यंत नाजूक झाली होती.


शेवटच्या काही षटकांत पाकिस्तानला विजयासाठी मोठी धावसंख्या हवी होती. आठव्या क्रमांकावर आलेल्या फहीम अश्रफने डच गोलंदाजीची पिसं काढली. त्याने केवळ ११ चेंडूंत २ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचत २६३ च्या स्ट्राईक रेटने नाबाद २९ धावा केल्या. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने १९.३ षटकांत विजय साकारला. या विजयानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास उंचावला आहे.

Comments
Add Comment

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि