सॅमसंग इंडियाचा 'गॅलेक्‍सी ए०७ ५जी' लाँच

मुंबई : सॅमसंग या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्‍सी ए०७ ५जी लाँच केला. या स्‍मार्टफोनमध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी आहे. हा स्‍मार्टफोन ऑनलाइन मनोरंजनासाठी, कन्‍टेन्‍ट कॅप्‍चर करण्‍यासाठी आणि दिवसभर विना-व्‍यत्‍यय वापरासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा स्‍मार्टफोन उद्योग-श्रेणीच्‍या डेटा सुरक्षिततेकरिता मापदंड देखील स्‍थापित करतो, ज्‍यामधून मन:शांती मिळते.


''सॅमसंगमध्‍ये आम्‍हाला अधिक महत्त्वाकांक्षी असलेल्‍या तरूण ग्राहकांच्‍या गरजांबाबत माहित आहे. आजचे जनरेशन झेड अधिक सोशल कन्‍टेन्‍ट निर्माण करत आहेत, ते अधिकाधिक मोबाइल गेमिंगचा आनंद घेत आहेत, तसेच अधिक प्रमाणात ऑनलाइन कन्‍टेन्‍टचा वापर करत आहेत. सॅमसंग गॅलेक्‍सी ए०७ ५जी 'मोअर ऑसम' असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये सर्जनशीलता, कार्यक्षमता व मनोरंजनाच्‍या संयोजनासह मोअर पॉवरफुल ५० मेग‍ापिक्‍सल कॅमेरा, दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहणारी ६००० एमएएच बॅटरी आणि अधिक आकर्षक १२० हर्ट्झ डिस्‍प्‍ले आहे. आम्‍हाला भारतातील तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा परिपूर्ण स्‍मार्टफोन लाँच करताना आनंद होत आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे उपाध्‍यक्ष आदित्‍य बब्‍बर म्‍हणाले.


हा स्मार्टफोन ४जीबी + १२८जीबी आणि ६जीबी + १२८जीबी (मायक्रोएसडीद्वारे २टीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येणारे) अशा दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगच्या सुमारे १८ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायामुळे तो प्रतिदिन अंदाजे ३० रुपयांमध्ये परवडणारा ठरतो.


सडपातळ व शक्तिशाली रचना: गॅलेक्‍सी ए०७ ५जी लाइट व्‍हायोलेट, लाइट ग्रीन आणि ब्‍लॅक या रंगांत उपलब्ध आहे. १९९ ग्रॅम वजन, ८.२ मिमी सडपातळ बॉडी आणि की आयलँड २.० फ्लॅट साइड फ्रेममुळे उत्तम ग्रिप मिळते. ६.७-इंच एफएचडी+ डिस्प्ले १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट व एचबीएम मोडमध्ये ८०० निट्स ब्राइटनेस देतो, ज्यामुळे तेज उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. २-स्टेप टेम्पर्ड ग्लास, आयपी५४ प्रमाणपत्र आणि जीएफआरपी बॅक पॅनलमुळे फोन अधिक मजबूत व टिकाऊ ठरतो.


प्रगत कॅमेरा आणि बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये ५०एमपी ऑटोफोकस वाइड कॅमेरा आणि २एमपी डेप्थ कॅमेरा असलेला ड्युअल रियर सेटअप आहे, जो आकर्षक बोकेह इफेक्टसह उच्च दर्जाचे फोटो देतो. ८एमपी फ्रंट कॅमेरा स्पष्ट सेल्फी व व्हिडिओसाठी उपयुक्त आहे. ६०००mAh क्षमतेची बॅटरी (२०% अधिक) आणि २५वॉट्स फास्ट चार्जिंगमुळे दिवसभर विनाव्यत्यय वापर शक्य होतो.


मन:शांतीसाठी अद्वितीय सुरक्षितता: सॅमसंग वॉलेटद्वारे युपीआय पेमेंटसाठी फिंगरप्रिंट व फेस रेकग्निशन सपोर्ट देण्यात आला आहे. हार्डवेअर-आधारित सॅमसंग नॉक्स वॉल्ट संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवतो. ऑटो ब्लॉकर आणि बिल्ट-इन थेफ्ट प्रोटेक्शन अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतात.


दीर्घकाळ विश्वासार्हता व कनेक्टिव्हिटी: गॅलेक्‍सी ए०७ ५जी वन युआय ८.० (अँड्रॉइड १६ आधारित) वर चालतो, ज्यात सोपे नेव्हिगेशन व अधिक वैयक्तिकरण पर्याय आहेत. सहा वर्षांचे ओएस अपग्रेड्स आणि सिक्युरिटी अपडेट्स हा फोन दीर्घकाळ सुरक्षित व अद्ययावत ठेवतात. १२ बँड्समधील ५जी सपोर्टमुळे संपूर्ण भारतात जलद व स्थिर कनेक्टिव्हिटी मिळते.


Comments
Add Comment

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी