Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाशिक्कामोर्तब झाले, जसप्रीत बुमराह खेळणार...

शिक्कामोर्तब झाले, जसप्रीत बुमराह खेळणार…

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात बॉर्डर – गावसकर करंडकसाठी ४ कसोटी सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने दोन्ही संघांमध्ये खेळविले जाणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट पुढे आले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत खेळण्यासाठी तंदुरुस्त ठरला असून भारतीय संघाचा एक भाग असू शकतो.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह हा दुखापतीमुळे न्यूझीलंड मालिकेतही संघात सहभागी होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो आता पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इनसाइडस्पोर्टच्या एका बातमीनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहेत. या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण त्याच्या प्रगतीवर ते अवलंबून असेल.

जुलै २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कंबरेला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाला होता. या दुखापतीमुळे गतवर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतुन तो बाहेर गेला होता. बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत ३० कसोटी सामने, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १२८, एकदिवसीय सामन्यात १२१ आणि टी २० मध्ये ७० विकेट्स घेतल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -