Saturday, July 13, 2024
Homeदेशदक्षिण अफ्रिका भारतात पाठवणार १०० चित्ते

दक्षिण अफ्रिका भारतात पाठवणार १०० चित्ते

पर्यावरण मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण अफ्रिका पुढील दशकभरामध्ये १०० आफ्रिकन चित्ते भारतात पाठवणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. नामिबियातून आठ चित्त्यांच्या आगमनानंतर १२ चित्त्यांची सरुवातीची तुकडी पुढील महिन्यात भारतात दाखल होणार आहे.

दक्षिण आशियाई देशात चित्ता पुन्हा आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेने भारताला १०० हून अधिक चित्ते देण्याचा करार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून आठ चित्त्यांच्या आगमनानंतर १२ चित्त्यांची सुरुवातीची तुकडी पुढील महिन्यात भारतात पाठवली जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाने दिली. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून चित्यांना भारतात आणण्यासाठीचा करार करण्यास सुरुवात झाली होती. पर्यावरण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘चित्त्यांची सुरक्षित लोकसंख्या स्थापन करण्यात मदत करण्यासाठी पुढील ८ ते १० वर्षांत दरवर्षी १२ चित्ते भारतात आणण्याची योजना आहे. भारत एकेकाळी आशियाई चित्यांचे घर होता. परंतु, देशात १९५२ पर्यंत हा प्राणी नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. भारतातील चित्ता

नामशेष होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या कातडीची तस्करी करण्यासाठी करण्यात आलेली शिकार.
२०२० मध्ये प्रायोगिक तत्त्वावर आफ्रिकन चित्ता देशामध्ये काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी आणला जाऊ शकतो, असा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. तेव्हा चित्त्यांना पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली.

दक्षिण आफ्रिकेसोबत करारासाठी बराच काळ चर्चा सुरू होती. सुरुवातीला पहिला चित्ता गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये भारतात येण्याची अपेक्षा होती. पण, या प्रक्रियेला काहीसा उशिर झाला. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आठ चित्त्यांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली. त्यानंतर त्यांना काही काळ क्वॉरंटाईन करण्यात आले होते.

चित्त्यांसमोरील आव्हाने

  • चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल.
  • चित्त्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल.
  • त्यांना १२ किलोमीटरच्या विशेष अधिवासात विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल.
  • चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल.
  • भारतात आढळणारे हरीण आफ्रिकेत आढळत नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणे चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे.
  • निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -