नवी दिल्ली : “आता साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र’ यावरच चर्चा झाली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल, असे स्पष्ट केले.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही
माहिती दिली.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्यांचा आढावा घेता अमित शहा यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुजय विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, अभिमन्यू पवार, धनंजय महाडिक हे सुद्धा नेते दिल्लीत अमित शहा यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. या बैठकीनंतर अमित शहा यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाली. या बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी शिंदे यांनी अमित शहा यांचे आभार मानत महाराष्ट्रातील साखर उद्योगांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी मार्जिंग आणि वर्किंग कॅपिटल, इनकम टॅक्सचे पेंडिंग विषय, लोनचा विषय, या विषयांचा आढावा घेत साखर उद्योगातील अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासाठीच्या योजनांवर अतिशय सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…