Sunday, December 7, 2025

मुंबई-पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडली

मुंबई-पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडली

मुंबई : मुंबई-पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडली असून पुढील दोन दिवस हवा प्रदूषित राहणार आहे. मुंबईतील हवा मागील दोन दिवसांपासून अतिशय वाईट श्रेणीत मोडत आहे.

पुढील दोन दिवस मुंबईचा एक्यूआय ३०० पारच राहणार, असा अंदाज हवा गुणवत्ता निरीक्षण करणारी संस्था सफरने वर्तवला आहे. तर पुण्यातही हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत असून इथला सरासरी एक्यूआय २१५च्या वर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदूषित राहणार असल्याचा अंदाज सफरने व्यक्त केला. श्वसनाचे विकार असलेल्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment