ठाकरे सरकारच्या काळात सर्वांनाच पैसे द्यावे लागत : जे. पी. नडडा

अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार


चंद्रपूर : 'मविआ'च्या काळात उद्धव ठाकरेंसह सर्वांना पैसे द्यावे लागत होते. अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे.


'मविआ' सरकारने दलाली आणि कमिशनखोरी केली, असा आरोप नड्डा यांनी केला. ते चंद्रपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.


नड्डा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली. मविआ सरकारने दलाली आणि कमिशन खोरी केल्यांचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन हिंदुह्दयसमा्रटाच्या मुलाने सीबीआयकडे तपास देण्यापासून मागे फिरले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, अशी टीका नड्डा यांनी केली. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोकं खाली करायची वेळ आली.


उद्धव ठाकरेंना माफ करायचे का?


महाविकास आघडीमध्ये डिलरशीप, ब्रोकरेंज आणि ट्रान्सफर असा फंडा होता. खूप दुख: झाले होते की मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विरोधक असणाऱ्या लोकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. अशा लोकांना माफ करायचे का असा प्रश्न जे.पी.नड्डा यांनी उपस्थित केला आहे.


भारतीय नागरिक भाग्यवान


संपूर्ण जग संकटाच्या काळात असताना, प्रत्येक देशावर आघात होत असताना भारतीय नागरिकांनी स्वत:ला भाग्यवान मानले पाहिजे, कारण या देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी केले. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुढे घेऊन जात आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने स्टील उत्पादन, मोबाईल निर्मिती, फार्मास्युटिकल, केमिकल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केली आहे. मोदीजींच्या याच धोरणांमुळे जग आज भारताकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे, असे जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे