आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर ४४ कॉल

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप


नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने ४४ कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले आहे, असा गंभीर आरोप लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी केला. परंतु, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान कायंदे यांनी दिले आहे.


सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यातच आता राहुल शेवाळे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.


"एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा सुरू आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे", असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.


दरम्यान, "लोकसभेत ड्रग्ज या विषयावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत अनेकांनी भाग घेतला. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ड्रग्जसंबंधात रियाची चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिसांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल एयू या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते. परंतु, मुंबई पोलिसांनी एयू म्हणजे रियाची मैत्रिण अनन्या उधास असल्याचे म्हटले होते. मात्र, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या

मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : “जर आमच्या मुलीने बिगर हिंदूच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडणार

प्रभू श्रीरामांच्या नगरीत इतिहासाची पुनरावृत्ती! अयोध्या दीपोत्सवात दोन नवीन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या, उत्तर प्रदेश : प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा आपल्या 'भव्य आणि दिव्य दीपोत्सवा'मुळे जागतिक