मोर्चा भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी होता की महाराष्ट्रहितासाठी?

आमदार नितेश राणे यांनी उडवली खिल्ली


मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. त्यांच्यासह आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचीही उपस्थिती होती. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे.


आजचा महाआघाडीचा हल्लाबोल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लाँच करण्यासाठी होता की महाराष्ट्रहितासाठी होता? दादा, नाना जागे व्हा, महत्वकांक्षा ओळखा, असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.


रश्मी ठाकरे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील थेट अशी कुठलीही जबाबदारी नाही. मात्र, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यापूर्वीही उबाठा गटाच्या विविध कार्यक्रमांमध्ये मंचावर आवर्जून उपस्थित असतात. मविआच्या मोर्चातही उद्धव ठाकरेंचे संपूर्ण कुटूंब उपस्थित होते. आमदार नितेश राणेंनी यावरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1604072935681056770

दरम्यान, या महामोर्चात आदित्य ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटूंबियांच्या बॅनरबाजीची चर्चा सुद्धा रंगली होती. यावेळी एका कार्यकर्त्याने दुचाकी फोटोंनी सजवली होती. यावेळी आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा फोटोवरील उल्लेख सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे हा मोर्चा समाजहितासाठी आहे की राजकीय महत्वकांक्षेसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल

मुंबई : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री

'सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तात्काळ निकाली काढा'

मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला अजित पवारांचे नाव

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व

दुबईत अडकलेल्या मराठी जनांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिला आधार दुबईतील बृहनमहाराष्ट्र

मुंबईत भर रस्त्यात पतीने केली पत्नीची हत्या

मुंबई : अंधेरी पूर्व भागातील सागबाग रोडवरील आराध्या रुग्णालयासमोर शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी