दोहा (वृत्तसंस्था) : फिफा वर्ल्डकप २०२२ (FIFA World Cup 2022) मधील सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने मॅक्सिकोवर विजय मिळवला. या सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने मेक्सिकोचा २-० असा पराभव करून पुढील फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
सौदी अरेबियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर अर्जेंटिनाच्या संघाचे या स्पर्धेतील आव्हान खडतर झाले होते. मॅक्सिकोविरुद्धचा सामना अर्जेंटिनासाठी करो या मरोचा होता. मेस्सीचा संघ मॅक्सिकोविरुद्ध हरला असता तर त्यांच्यासाठी राऊंड ऑफ १६ चे दरवाजे पूर्णपणे बंद झाले असते. हा सामना अर्निणित ठरला असता तरी अर्जेंटिनाच्या संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागले असते. परंतु, या सामन्यात मेस्सीची जादू चालली आणि अर्जेंटिनानं महत्त्वाचा सामना जिंकला.
पहिल्या हाफमध्ये मॅक्सिकोच्या संघानं काही चांगल्या संधी निर्माण केल्या. परंतु, त्यांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाच्या संघानं जबरदस्त सुरुवात केली. अर्जेंटिनाच्या फॉरवर्ड लाइनने गोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. दरम्यान, ६४ व्या मिनिटाला मेस्सीनं अर्जेंटिनासाठी अप्रितिम गोल केला. या गोलनंतर मेक्सिकोच्या संघानं बरोबरी साधण्यासाठी खूप प्रयत्न केला. त्यानंतर ८४ व्या मिनिटाला फर्नांडिसनेही डाव्या बगलेत खोलवर मिळालेल्या पासवर नियंत्रण मिळवत एका क्षणात भन्नाट गोल केला आणि पुन्हा एकदा पाठीराख्यांनी स्टेडियम दणाणून सोडले.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…