Kabaddi match : कुडाळात उद्यापासून रंगणार कबड्डीचा थरार!

कुडाळ (वार्ताहर) : हरी ओम् मंगल कार्यालयाच्या विद्यमाने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या (Kabaddi match) मान्यतेने उद्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.


सिंधुदुर्ग-कुडाळ-वाडीवरवडे येथील हरी ओम् मंगल कार्यालयाच्या समोरील पटांगणावर "स्व. विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकासाठी" हे सामने खेळविण्यात येतील.


या स्पर्धेत सिंधुदुर्गातील पंचक्रोशी-फोंडा, रेवताळे-मालवण, सिंधुपुत्र-कोळोशी, श्री लक्ष्मीनारायण-वालावल-कुडाळ, गुडीपूर-कुडाळ, शिवभवानी आणि जय महाराष्ट्र-दोन्ही सावंतवाडी, जय मानसिश्वर-वेंगुर्ला, यंग स्टार-कणकवली आदी १६ नामवंत संघ सहभागी होणार आहेत. सर्व सामने सायंकाळच्या सत्रात विद्युत प्रकाश झोतात खेळविण्यात येतील. अजिंक्यतारा-वाडीवडवरे विरुद्ध जय गणेश पिंगुली या सामन्याने उद्या सायंकाळी ५.३० वा. स्पर्धेला प्रारंभ होईल.


स्पर्धेतील विजेत्या संघाला "स्व. विठ्ठल कृष्णाजी धुरी चषक" व रोख रक्कम सात हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला " स्व. सत्यभामा विठ्ठल धुरी चषक" व रोख रक्कम पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल. दोन्ही उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी चषक व रोख रक्कम तीन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल.

Comments
Add Comment

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.