Rape : पुण्यातील माजी सरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  129

पुणे : पुरंदर तालुक्यातील माजी सरपंच संतोष नाझिरकर याने एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार (Rape) केला. या प्रकरणी तरुणीने आपल्यावर होणाऱ्या घटनांची पूर्व कल्पना आपल्या आई दिली आणि लोकेशन पाठवलं आणि सतर्क होत आई तत्काळ पोलीसांना माहिती घटनास्थळी जाऊन पोलिसानी संतोष नाझिरकरला अटक केली.


या प्रकरणी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणी माजी सरपंच संतोष नाझिरकर (वय ४० रा. पुरंदर तालुका) या आरोपीला अटक केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नाझिरकर पीडित अल्पवयीन तरुणी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती.


चॅटिंग करत दोघांमध्ये चांगलीच ओळख झाली. नाझिरकर याने बुधवारी बाहेर जेवायला जाऊ असं सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज इथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने घटना घडण्यापूर्वी बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला बलात्कार करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल