नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून १० विकेट्सने झालेला लाजिरवाणा पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी लागला. (Ajit Agarkar) बीसीसीआयने शुक्रवारी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली.
बीसीसीसीआयने नव्या निवड समितीसाठी तातडीने अर्ज मागवले आहेत. चेतन शर्मा यांच्यानंतर निवड समितीचा नवा अध्यक्ष कोण? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. निवड समितीच्या शर्यतीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
चेतन शर्मा यांच्यानंतर आता अजित आगरकर निवड समितीचा नवा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याआधीही अजित आगरकरने निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्याला यश मिळू शकले नाही. परंतु, यंदा अजित आगरकर याचीच निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अजित आगरकरशी अद्याप याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु त्याला या पदासाठी अर्ज करायचा आहे. ती त्याची निवड आहे. मागच्या वेळीही थोडक्यात त्याचे अध्यक्षपद गेले होते”, अशी माहिती एका इंग्रजी वाहिनीने आपल्या वृत्तात दिली आहे.
अजित आगरकरने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारतासाठी २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ६२ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजित आगरकरने २८८ विकेट्स घेतले आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५८ विकेट्सची नोंद आहे. याशिवाय, टी-२० क्रिकेटमध्ये त्याला ४७ विकेट्स मिळाले आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…