मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस-वे) (Mumbai-Pune Expressway) मध्यरात्री बोरघाटात झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. तिघे जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने निघालेल्या या इर्टिगा गाडीला दुसऱ्या एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला.
या धडकेमुळे गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली आणि दरवाजा तुटल्याने प्रवासी बाहेर पडले. अति रक्तस्त्रावामुळे काहींचा मृत्यू झाला. सगळे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातले असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.
जखमींना पनवेलमध्ये एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच महामार्गावरुन जाणाऱ्या व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…