Measles outbreak : मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गोवर या आजाराची साथ (Measles outbreak) झपाट्याने वाढत आहे. गोवर या आजाराने (Measles outbreak) सोमवारी आणखी एका १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात झाला. यामुळे एकूण मृतांचा आकडा ४ इतका झाला आहे. तसेच पुरळ आणि ताप अशी गोवर सदृश्य लक्षणे असलेल्या ६ रुग्णांना ऑक्सिजनवर उपचाराकरिता ठेवण्यात आले आहे.


गेल्या वर्षभरात गोवर या आजाराचे (Measles outbreak) १२६ बालकांचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई शहरावर गोवरचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे.


सोमवारी मुंबईच्या नळ बाजारात राहणाऱ्या १ वर्षाच्या मुलाचा गोवरच्या आजाराने कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.



गोवरमुळे मुंबईत ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू


गोवंडी परिसरात गेल्या महिन्याभरात गोवर या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने यांची गंभीर दखल घेतली आहे. तसेच याकरिता केंद्रातून तज्ज्ञाची समितीचे पथक गेले तीन दिवस पथक मुंबईत तळ ठोकून होते. त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी संवाद साधला होता. त्याचप्रमाणे गोवंडी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील आरोग्य केंद्रावर भेटी दिल्या होत्या. या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकार आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काही सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोवर लसीकरणाची मोहीम हाती घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या