Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

तालिबान सरकारचे महिलांवर कठोर निर्बंध

तालिबान सरकारचे महिलांवर कठोर निर्बंध

अफगाणिस्तान (वृत्तसंस्था) : तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.


अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होताना पाहायला मिळत आहे. तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानी महिलांचे आयुष्य कठीण झाले आहे. तालिबानकडून महिलांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महिला त्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढत आहेत. तालिबानने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील तरुणी आणि महिलांनी त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलक तरुणींना तालिबान्यांकडून मारहाण केली जात आहे.


अफगाणिस्तानातील तालिबान सरकार महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना रोखण्यासाठी तरुणींना मारहाण करण्यासही मागेपुढे पाहत नाही. ईशान्य अफगाणिस्तानमधील एका विद्यापीठात विद्यार्थिनींना बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली. तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांवर दडपशाही सुरू आहे. महिलांना शिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. महिलांच्या नोकरी करण्यास बंदी घातली जात आहे. तालिबानमधील महिलांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून सरकारची दडपशाही दिसून येत आहे.

Comments
Add Comment