मुंबई : माजी महापौर शोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
त्याच्याच जबाबात पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याची माहिती समोर येत आहे. दाखल गुन्ह्यात आरोपींमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नाही. सध्या याच प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि समोर आलेल्या माहितीच्या आधारे त्यांना चौकशीला बोलाविण्यात आले होते. त्यानुसार, चौकशी करत पुन्हा काही कागदपत्रांसह शनिवारी बोलाविण्यात आले आहे.
दाखल गुन्ह्यात एकूण ९ तक्रारदारांची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडून पैसे उकळूनही त्यांना घरे देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. आरोपींच्या चौकशीत यांच्याकडून घेतलेले पैसे पेडणेकर यांनाही दिल्याच्या माहितीवरून ही चौकशी होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…