उद्धव ठाकरेंचे राजकारण ‘मातोश्री’पुरतेच...

  81

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा पुण्यातही शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.


यावेळी उद्धव ठाकरे गटाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपची रणनीती काय असणार आहे? असा सवाल पत्रकारांनी त्यांना विचारला असता, ‘उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना कुठे राहिली आहे. ५६ आमदारांमधील ५ ते ६ आमदार शिवसेनेकडे राहिले आहेत. तेसुद्धा लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देशात बरेच काही आहे. त्यांचे राजकारण ‘मातोश्री’पुरते उरले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते माझे सहकारी होते. तेव्हा ते असे नव्हते,’ अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.


पंतप्रधान मोदी हे तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यातील १० लाख नोकऱ्यांचा पहिला टप्पा पार केला आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले. या तरुण-तरुणींना शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देऊन चांगले काम केले आहे. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यांना आनंद झाला आहे. यावरून कोणी राजकारण करत असेल, तर दिवाळीनिमित्त मी काही बोलणार नाही, असेही नारायण राणे यांनी
स्पष्ट केले.


आणखी ४ आमदार संपर्कात...


शिवसेनेतील फुटीनंतर ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले, तर १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. मात्र या १५ पैकी बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाण्यास उत्सुक असून चार आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण