नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘रोजगार मेळा’ अंतर्गत १० लाख कर्मचाऱ्यांसाठी भरती मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्रेही दिली.
नरेंद्र मोदी म्हणाले, भारतातील युवा शक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या ८ वर्षात देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे. आज त्याला आणखी एक दुवा जोडला गेला आहे. आज केंद्र सरकार ७५००० तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण स्वावलंबी भारताच्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये आमचे नवोदित उद्योजक, शेतकरी, सेवा आणि उत्पादन सहयोगी यांचा मोठा वाटा आहे.
रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, येत्या काही महिन्यांत लाखो तरुणांना भारत सरकार वेळोवेळी नियुक्ती पत्रं प्रदान करेल. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ७-८ वर्षात आम्ही १० वरून ५ वर झेप घेतली आहे. आज आमचा सर्वाधिक भर तरुणांच्या कौशल्य विकासावर आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत देशातील उद्योगांच्या गरजेनुसार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्टार्टअप इंडिया मोहिमेनं देशातील तरुणांची क्षमता संपूर्ण जगात प्रस्थापित केली. २०१४ पर्यंत देशात मोजकेच स्टार्टअप होते, आज ही संख्या ८० हजारांच्या पुढे गेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई: अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे भाव १ लाख पर्यंत कसे पोहोचले.…
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात 'नवीन बीड पॅटर्न' सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी…
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…