मुंबई : मुंबईत पंधरा दिवसांसाठी पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत कुठल्याही प्रकारे एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७ नुसार लागू करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक आदेशामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका काढता येणार नाहीत. त्याचबरोबर मिरवणुकांमध्ये फटाके फोडणे, लाऊडस्पीकर्स लावणे आणि म्युझिक बँडला देखील बंदी असेल. यामध्ये लग्न समारंभ आणि अंत्ययात्रा यांना वगळण्यात आले आहे.