गाझियाबाद : दिल्लीतील एका महिलेवर गाझियाबादमध्ये निर्भयासारखे अत्याचार झाले. ५ नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर २ दिस सतत सामूहिक बलात्कार केला. आरोपीने अमानुषतेची हद्द ओलांडत पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही घातला. त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकून ते पळून गेले. पीडित महिला रस्त्याच्या कडेला एका पोत्यात आढळली. तेव्हाही रॉड तिच्या शरीरातच होता. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिनू, शाहरुख, जावेद, ढोला, औरंगजेब ऊर्फ झहीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पीडित महिलेच्या भावाने सांगितले की, घटना १६ ऑक्टोबरची आहे. बहीण माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आली होती. पार्टी आटोपल्यानंतर मी रात्री साडेनऊ वाजता दिल्ली आश्रम रोडवरून नंदग्राम हायवेवरून निघालो, तिथे माझी बहीण ऑटोची वाट पाहत होती. रात्री साडेअकरा वाजता भाच्याने फोन करून सांगितले की, आई घरी पोहोचली नाही. त्यानंतर शोध घेतला, पण सापडली नाही.
पोलिसांच्या एफआयआरनुसार, पीडितेला काही स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तरुणांनी रस्त्यावरून उचलून नेले होते. स्कॉर्पिओमध्ये चार जण होते. ते तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी एक तरुण आधीच हजर होता. या पाच जणांनी दोन दिवस तिच्यावर बलात्कार केला. यानंतर हात-पाय बांधून पोत्यात टाकून तिला फेकून दिले.
गाझियाबाद शहर पोलीस अधिक्षक निपुण अग्रवाल म्हणाले की, ‘चौकशीत महिलेने सांगितले की, ती नंदनगरी दिल्लीची रहिवासी आहे आणि एक दिवसापूर्वी नंदग्राम भागातील बॉम्बे कॉलनीत तिच्या भावाच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. जेव्हा तिचा भाऊ तिला परत जाण्यासाठी रोडवर सोडून गेला तेव्हा काही लोकांनी तिला तेथून नेले, जे तिच्या आधीपासूनच ओळखीचे होते.
१८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता पोलीस स्टेशन नंदग्रामला यूपी-११२ मार्फत माहिती मिळाली की, आश्रम रोडजवळ एक महिला पडली आहे. पोलिसांनी तेथे पोहोचून महिलेला रुग्णालयात नेले.
दरम्यान, पोलीस चौकशीत आरोपींची या महिलेशी पूर्वीपासून ओळख असून मालमत्तेवरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु असल्याचे समोर आले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी बुधवारी सकाळी ट्विट केले आहे की, ‘दिल्लीची मुलगी गाझियाबादहून रात्री परत येत होती, तिला जबरदस्तीने गाडीत बसवले. ५ जणांनी २ दिवस बलात्कार केला. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला. रस्त्याच्या कडेला एका पोत्यात आढळली, रॉड तेव्हाही तिच्या आतच होता. हॉस्पिटलमध्ये जीवन-मृत्यूची लढाई सुरू आहे. एसएसपी गाझियाबाद यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…