बोईसरमध्ये चोरी करणाऱ्या गुजरातच्या ‘लेडी गँग’ गजाआड

बोईसर (वार्ताहर) : बोईसरमध्ये कपड्याच्या दुकानातून चोरी करणाऱ्या गुजरातमधील लेडी गँगला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बोईसरमधील ओसवाल एंपायर येथील व्हाईट हाऊस या तयार कपड्यांच्या दुकानाबाहेर काही अनोळखी महिला संशयास्पद हालचाली करत असताना दिसून आल्या. याप्रकरणी एका व्यक्तीने काही तरी संशयास्पद घडत असल्याची माहिती दुकानाच्या मालकाला फोन करून देताच दुकान मालकाने तातडीने दुकानाकडे धाव घेतली. मात्र मालक दुकानात पोहचण्याच्या आधीच सर्व महिला पसार झाल्या होत्या. दुकानाचे शटर खाली वाकवल्याचे दिसताच दुकान मालकाने याप्रकरणी बोईसर पोलिसांना खबर दिली.


पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकेबंदी लावून तपासणी सुरू केली असता, चोरी करून पळण्याच्या बेतात असलेल्या सहा महिलांना बोईसर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले. या सर्व महिला मूळच्या गुजरातमधील अहमदाबादच्या असून रेल्वे स्टेशनवर राहून चोरी करण्यात सराईत आहेत.


यामध्ये टोळीतील एक महिलेने दुकानाच्या आत शिरून टेबलच्या खणात असलेली ३ हजार रोख रक्कम चोरली होती. तर इतर महिला या दुकानाच्या बाहेर पहारा देत बसलेल्या होत्या. चोरी झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खोंडे, पोलीस नाईक महेश कडू यांच्या पथकाने या महिल्यांच्या टोळीला बोईसर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेत अटक केली आहे.

Comments
Add Comment

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका