मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात तसेच मुरबाड शहर परिसरात मागील दोन आठवड्यात हत्ती नक्षत्राच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धिंगाणा घालून पाऊस बरसला होता त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे भाताच्या पिकाला काही प्रमाणात फटका बसला आहे.
परंतु आता सोमवारी चित्ता नक्षत्र निघाल्याने पुन्हा एकदा शेतकरी वर्ग चिंतेत असतानाच मंगळवारी ठीक चार वाजता दरम्यान जोरदार मुरबाड परिसरात विजेच्या गडगडासह पाऊस बरसल्याने शेतकरी वर्ग हवालदार झाला आहे. त्यात भात कापणीचे सुद्धा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चित्ता नक्षत्र नक्षत्र निघाल्याने हा नक्षत्र जवळपास १४ दिवस पडत असतो त्यापैकी आज पहिल्याच दिवशी जोरदार मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळे उरलेले काही दिवस जर चित्ता नक्षत्रचा पाऊस पडला तर शेतीचे अतोनात मोठे नुकसान होईल अशी चिंता शेतकरीवर्गाने व्यक्त केली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…