Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तापमान ४० अंशांवर पोहोचलेले असताना, डोळ्यांचा त्रास वाढतो आहे. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील नेत्र विभागात डोळ्यांच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांबरोबर उन्हाच्या तीव्रतेमुळे डोळे कोरडे पडणे, खाज येणे, जळजळ, सूज येणे किंवा सतत पाणी असे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.


ठाण्यामध्ये उन्हाळ्यात एरवी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस असत. मात्र गेल्या काही वर्षात तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे नकोसे वाटत. अशातच उन्हात जास्त फिरल्पामुळे चक्कर येणे, पोटात मळमळ डी हायड्रेशन सारख्या बाबींबरोबर डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


"उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसातून किमान दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजे. डोळ्याचा त्रास अधिक जाणवत असेल तर कोणताही घरगुती उपाय न करता रुग्णालयात नेत्र चिकित्सकाना डोळे दाखवावेत. - डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्र तज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय) सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्र विभागात उन्हामुळे डोळे सुजणे, लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, सूज आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती नेत्र तब्ज डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.



उन्हाळ्यात होणारे सामान्य डोळ्यांचे त्रास


जळजळ व लालसरपणा, उष्णतेमुळे डोळे कोरडे व अस्वस्थ होतात. कंजंक्टिव्हायटिसः संसर्गजन्य आजार वाढत असून, डोळ्यांत सूज व पाणी येणे यासारखी लक्षण दिसत आहेत. प्रकाश संवेदनशीलता (फोटोफोबिया): उन्हामुळे प्रकाश सहन न होणे, डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात. उन्हात फिरताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी चांगल्या सनग्लासेस वापरा डोळ्याना चोळू नकाः अस्वस्थता वाटल्यास स्वच्छ कपडनाने सौम्यपणे पुसा, टोपी किया छत्री वापरा, डिजिटल स्क्रीनपासून २० फूट लावून बघा, सतत मोबाईल बघू नका, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे