नाशिक (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन विभागाने नाशिक रोड परिसरातील शिंदे गाव व सुभाष रोड येथील सुगंधित पानमसाला व गुटख्याच्या गोदामावर छापा मारून सुमारे साडेअठरा लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिला छापा शिंदे गावात टाकण्यात आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गोपाळ विजय कासार यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, शिंदे गाव येथील लोहिया कंपाऊंडमध्ये असलेल्या झेन मार्केटिंग एंटरप्रायजेस येथे अन्न सुरक्षा मानके कायदा व तरतुदीचे उल्लंघन करून अज्ञात गोदाम जागा मालकाने व साठ्याच्या मालकाने १ लाख ५० हजार रुपये किमतीचा पानमसाल्याची २५० पाकिटे, १८ हजार ७५० रुपये किमतीची डब्ल्यू सुगंधी तंबाखूची १२५० पाकिटे, ९ लाख २१ हजार ६०० रुपये किमतीच्या २४ गोण्या राजनिवास पानमसाला, २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या एक्सएल सुगंधित तंबाखूच्या पाच गोण्या, १ लाख २६ हजार रुपये किमतीच्या हिरा पानमसाल्याच्या दहा गोण्या, १५ हजार रुपये किमतीच्या रॉयल सुगंधित तंबाखूच्या पाच गोण्या, सुगंधित तंबाखूचे ८२५ पाऊच, असा एकूण १४ लाख ७५ हजार ४७५ रुपयांचा साठा अवैधरित्या बाळगताना आढळून आला. राज्यात गुटखा विक्रीस प्रतिबंध असताना त्याचा साठा करून आरोग्यास हानी पोहोचविल्याबद्दल अज्ञात गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा छापा सुभाष रोड येथे टाकण्यात आला. या प्रकरणी अन्न व औषध विभागाचे अधिकारी प्रमोद शिवलाल पाटील (रा. गोविंदनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी नाशिक रोड येथील सुभाष रोड येथे असलेल्या सचदेव आर्केडमध्ये ७ नंबरच्या गाळ्यात छापा टाकला. यावेळी गोदामाच्या जागा मालकांनी व साठा करणाऱ्या इसमांनी येथे प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व गुटखा साठवून ठेवला होता. यावेळी पथकाने केलेल्या कारवाईत ७६ हजार रुपये किमतीची सुंदरी स्वीट सुपारीची १२७० पाकिटे, वाह सुगंधित तंबाखूची १३० पाकिटे, बाबा सुगंधित तंबाखूची २१० पाकिटे, जाफरानी जर्दाची ४४ पाकिटे, ८५ हजार रुपये किमतीचे बाबा-१६० टोबॅकोचे २३० बॉक्स, बाबा नवरतन पानमसाल्याचे चार बॉक्स, तसेच २४ हजार रुपये किमतीचे गरम इंटरनॅशनल सिगारेटची १०० पाकिटे, २८ हजार रुपये किमतीची पॅरिस स्पेशल फिल्टर सिगारेटची १४० पाकिटे, २७ हजार रुपये किमतीची किरण गोल्डन सुगंधित सुपारीची ४५० पाकिटे, तसेच ९ हजार रुपये किमतीची भाईजी स्वीट सुपारीची १५० पाकिटे, असा एकूण ३ लाख ६१ हजार ५७० रुपये किमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात गोदाम मालक व जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा तपास अनुक्रमे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.
मुंबई: अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे भाव १ लाख पर्यंत कसे पोहोचले.…
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात 'नवीन बीड पॅटर्न' सध्या चर्चेत आहे, पण त्यामागचं काळं वास्तव आणखी…
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…