विरार (वार्ताहर) : वसईसह राज्याच्या इतर भागातील सहकारी संस्थांना अनेक समस्या भेडसावत आहेत. सहकारी संस्थांकडून विक्री केल्या जाणाऱ्या मालावर राज्य शासनाने लावलेला जीएसटी कमी करावा आणि सहकारी संस्थांना दिलासा द्यावा, या मागणीसह इतर विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी वसईतील सहकारी संस्थेतर्फे केली जात आहे.
सहकारी संस्थांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे; मात्र राज्य शासनाच्या विविध धोरणांमुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी वसई पान मार्केटिंग सहकारी सोसायटीचे चेअरमन रोहन गोन्साल्विस यांनी राज्याचे सहकार मंत्री सावे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. शेड्युल बँकांना गुंतवणूक करण्याची जी मुभा आहे, त्याप्रमाणे सहकारी संस्थांना गुंतवणूक करण्याची सुविधा असावी.
तसेच ज्या सहकारी संस्थांचा निव्वळ नफा ५० कोटींपेक्षा कमी आहे त्यांना आयकरातून सूट मिळावी. यासह सहकारी संस्थांकडून विक्री केल्या जाणाऱ्या मालावर राज्य शासनाने जीएसटी कमी आकारावा जेणेकरून खासगी व्यापाराबरोबर स्पर्धा करता येईल; तर खासगी व्यापारी माल जीएसटी न लावता विकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे यावर आळा घालता येईल, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…