आयसीसी क्रमवारीत हरमनप्रीत कौर पाचव्या स्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील धडाकेबाज खेळीचा भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत हरमनप्रीत कौर पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरने १४३ धावांची धमाकेदार फलंदाजी केली होती.


हरमनप्रीत कौरसह सलामीवीर स्मृती मन्धाना आणि दीप्ती शर्मा यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे.आयसीसीच्या ताज्या क्रमावारीनुसार, स्मृती मन्धाना आणि दीप्ती शर्माच्या क्रमावारीत एका क्रमाने सुधारणा झाली आहे. स्मृती मन्धाना सहाव्या तर, दिप्ती शर्मा २४व्या स्थानावर पोहचली आहे.


भारताची गोलंदाज पूजा वस्त्राकरलाही चार स्थानांचा फायदा झाला आहे. तिने ५३ व्या स्थानावरून ४९व्या स्थानावर झेप घेतली आहे. हरलीन देओलने मोठी झेप घेत ८१व्या स्थानावर पोहचली आहे. तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघाने यजमान संघाला ३-० अशी धूळ चारली. तब्बल २३ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

Comments
Add Comment

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.