वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे मध्यस्थी करणार

  65

मुंबई : गुजरातकडे वळलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वत: राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात नारायण राणे यांनी आज सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.


वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे, राज्यातूनच कंपनीला जास्त सवलत दिली जाईल, असे मुद्दे एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडणार आहेत.


हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात आला. मात्र आता मुख्यमंत्री शिंदेही हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी आग्रही आहेत. नारायण राणे यांनी सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर राणे हे शिंदे आणि फडणवीसांसह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक