विहिरीत उडी मारीन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, गडकरी असे का म्हणाले?

  169

नागपूर : भाजपाच्या कार्यकारिणीतून पत्ता कट झाल्यापासून नितीन गडकरी वारंवार आपल्या विधानांमुळे चर्चेत येत आहेत. नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. तेव्हाचं त्यांचं विधानही आता चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या विद्यार्थी दशेतला हा किस्सा त्यांनी सांगितला आहे.


राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणार नाहीत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलंय. गडकरींनी सांगितलं की, जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी म्हणाले की, मी श्रीकांतला सांगितले की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही.


नितीन गडकरींनी नुकतेच एक विधान केले होते. ज्यात ते म्हणाले होते की, कधीकधी आपल्याला राजकारण सोडण्याची इच्छा होते. कारण आयुष्यात इतरही अनेक गोष्टी आहेत. आजकाल राजकारण सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनण्याऐवजी सत्ताकारणात गुंतत चालले आहे. गडकरी असेही म्हणाले होते की, पुढच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण आपले पोस्टर्स लावणार नाही, कोणाला काही देणार नाही. जर तुम्हाला मतदान करायचे तर करा, नाहीतर नका करू.

Comments
Add Comment

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला राडा

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै