मुंबई (वार्ताहर) : मुंबई पालिका हद्दीतील मध्य रेल्वे लाईनवरून जाणारे ४ पूल आणि पश्चिम रेल्वे लाईनवरून जाणारे ९ पूल हे धोकादायक स्वरुपात असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत.
त्यामुळे गणपती आगमन आणि विसर्जना दरम्यान पुलावरून जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात, त्याचबरोबर पुलावर अधिक वेळ न थांबता पुलांवरून त्वरित पुढे जावे, या अनुषंगाने पालिका व मुंबई वाहतूक पोलिस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे मुंबई पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याद्वारे सांगण्यात आले.
पालिका हद्दीतील ‘मध्य रेल्वे लाईन’वरून जाणाऱ्या ४ पुलांमध्ये घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज, करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल्वे ओव्हर ब्रीज, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रीज या पुलांचा समावेश आहे. तर, ‘पश्चिम रेल्वे लाईन’वरून जाणाऱ्या ९ पुलांमध्ये मरिन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज, ग्रँटरोड व मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणारा रेल्वे ओव्हर ब्रीज, मुंबई सेंट्रलच्या जवळ असणारा बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज, प्रभादेवी कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रीज, दादर टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज यांच्यासह ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारे सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज, फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रीज आणि केनडी रेल्वे ओव्हर ब्रीज या पुलांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…