नवी दिल्ली : महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये ३.४ इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे ३.२८ च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.
कोल्हापूरपासून पूर्वेला १७१ किमी अंतरावर महाराष्ट्रात मध्यरात्री २:२१ च्या सुमारास ३.९ तीव्रतेचा भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या १० किलोमीटर खोलवर होता. तर, काश्मीरमध्ये पहाटे ३:२८ वाजण्याचा सुमारास जाणवलेले भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली पाच किलोमीटरपर्यंत होता. अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मध्यरात्री २:५५ वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी रिस्टर स्केल होती. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली ८० किमी खोलीवर होता.
दरम्यान, या सर्व ठिकाणी जाणवलेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत अधिकचे अपडेट्स येणे बाकी आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…