मुख्य रस्त्याशी जोडणार गाव पाड्यातील रस्ते : डॉ. विजयकुमार गावित

विरार (प्रतिनिधी) : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते वापरण्यायोग्य राहत नाहीत, अशा गाव पाड्यात पक्के रस्ते तयार करुन हे रस्ते मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामधील जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित बोलत होते.


यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भुसारा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनावने, सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, आयुषी सिंह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, दुर्गम भागातील ग्रामस्थामध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी यासाठी आशा सेविका घरोघरी जाऊन आरोग्याविषयी माहिती देणार आहेत. आदिवासी क्षेत्रातील समस्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करणाच्या सुचना दिल्या असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल या उपक्रमामध्ये गाव, पाड्यातील प्रत्येक घरात ५५ लिटर शुध्द पाणी मिळण्यासाठी पाणी शुध्दीकरण प्रकल्प स्थापन करण्यात येईल, असेही डॉ. गावित यांनी सांगितले.

Comments
Add Comment

वाढवण बंदरामध्ये हजारो स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार

तरुणांसाठी 'जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स' सुरू एससीआय मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसोबत सामंजस्य

वाढवण बंदरामध्ये हजारो स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार, तरुणांसाठी 'जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स' सुरू

पालघर : भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मध्ये स्थानिक तरुणांना नोकरीची संधी

महाराजांच्या किल्ल्याची विटंबना! सिगारेट, दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने शिवप्रेमी आक्रमक

जंजिरे धारावी किल्ल्यावर कचऱ्याचा आणि अश्लीलतेचा विळखा; दुर्गप्रेमींचा प्रशासनावर संतापाचा 'बुलडोझर' 'आंदोलन

महादेवाच्या पिंडीवर अवतरली नागदेवता! बघ्यांची उसळली गर्दी

वाडा: तालुक्यातील दुपारेपाडा या गावातील श्री गणेश मंदिरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मंदिरातील श्री

Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना

विरारमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; मोठे आर्थिक नुकसान

विरार: विरार पूर्वेकडील आरजे सिग्नलजवळ असलेल्या एका फर्निचरच्या मोठ्या दुकानाला २१ ऑक्टोबरच्या दुपारी भीषण आग