मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात सर्वांचे सहकार्य हवे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग तयार करण्याचे काम सरकार करतच आहे. पण, याकरिता लागणाऱ्या जमीन संपादनाच्या कामात स्थानिक आमदारांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत सांगितले. दरम्यान, हा महामार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल तसेच गौरी - गणपतीसाठी येत्या २५ ऑगस्टपर्यंत त्यावरील खड्डे भरले जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.


सुनील प्रभू यांनी या विषयावरील लक्षवेधी सूचना मांडली होती. कोकणात घरातली एक व्यक्ती गावी असते, तर चार मुंबईत. त्यात त्यांच्यात वाद असला तर जमीन संपादनाला वेळ लागतो. नुकसानभरपाई देणेही अवघड होते. त्यामुळेच स्थानिक आमदारांनी यात सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे, असे राणे म्हणाले.


गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास कमी करण्यासाठी या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २५ ऑगस्टपर्यंत हे खड्डे भरले जातील आणि त्यानंतर लगेचच तेथे प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. या पाहणीच्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सोबत घेतले जाईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या