नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत भाजपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार नितेश राणे स्वतः या रॅलीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या रॅलीत सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार नितेश राणे यांनी अभिवादन करत या रॅलीला सुरुवात करण्यात आली.

तसेच आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना रॅलीच्या प्रारंभीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक, बाजारपेठ, पटकी देवी मार्गे, शिवाजीनगर येथून नडवे रोडवरील तहसीलदार कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे ५०० हून अधिक दुचाकीस्वार व १५० हून अधिक रिक्षा सहभागी झाल्या. या रॅलीमुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक चांगली वातावरण निर्मिती देखील झाली.

या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर,भाजपा प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवन, नगरसेवक अभिजीत मुसळे, मेघा गांगण, अॅड. विराज भोसले, शिशिर परुळेकर, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, पंकज पेडणेकर, नितीन पाडावे, समर्थ राणे, सुरेश सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, स्वप्नील चिंदरकर, सिद्धेश वालावलकर, महेश सावंत, राकेश परब, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर, पप्पू पुजारे, बंडू गांगण, नगरसेवक रवींद्र गायकवाड, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, कळसुली सरपंच सचिन पारधीये, राजा पाटकर, भाई आंबेलकर, शिवसुंदर देसाई, कलमठ माजी सरपंच देविका गुरव, लक्ष्मण घाडीगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, इब्राहिम शेख, अभय घाडीगावकर, आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांच्यासह पोलीस बंदोबस्त कार्यरत ठेवण्यात आला होता.

Recent Posts

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

9 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

17 minutes ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

1 hour ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

1 hour ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

3 hours ago