आजही राज्यात मुसळधार

  301

मुंबई : राज्यात सात ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरूच असून कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि विदर्भात पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला आहे. तर मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.


नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द


पुरपस्थितीमुळे नागपूरमध्ये आज होणाऱ्या विद्यापिठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


विदर्भात पावसाची दमदार हजेरी


विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून सर्वदूर विदर्भात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरस्थितीत कायम असून, त्यात अधिकची भर पडली आहे. शेकडो गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. शेत-शिवारात पाणी साचल्याने लाखो हेक्टरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. तीन दिवसात विदर्भात तब्बल १९ जण पुरात वाहून गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम आहे.


धरणे भरली तुडूंब


घाटमाथ्यावर पावसाची मुसळधार सुरूच आहे. धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातारा, रायगड, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिला. सातारा जिल्ह्यात पाऊसाचा जोर कायम असून सर्व धरणे ओवरफ्लो झाली आहेत. तर कोयना धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना

शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार - नितेश राणे

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार सिंधुदुर्ग :

कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन  पुणे: कोंढवा