मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते.
प्रवीण राऊतांकडून वर्षा राऊतांच्या खात्यावर १ कोटी ६० लाख जमा झाल्याचा ईडीचा आरोप. यातून अलिबागमध्ये प्लॉट घेतल्याचा दावा केला आहे. प्रवीण हा संजय राऊतांचा ‘फ्रंटमॅन’ असल्याचा आरोप करत १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर ईडीकडून ठपका ठेवण्यात आला आहे.
हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्राचाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे १०३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची ९ कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची २ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नात तिप्पट वाढ मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड…
नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला…
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासकीय…
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…