ई-रिक्षाच्या विरोधात माथेरानमध्ये अश्वपालकांचा मूक मोर्चा

  76

माथेरान (वार्ताहर) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करावी, यासाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झालेली आहे. आगामी काळात ई-रिक्षा सुरू झाल्यास व्यवसायावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अश्वपालकांनी मूक मोर्चा काढला. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे व अधीक्षक कार्यालयात जाऊन ई-रिक्षाच्या विरोधात त्यांनी निवेदन सादर केले आहे.


वाहनास प्रतिबंध असलेले आशिया खंडातील माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. ई-रिक्षामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अश्वपालकांचा व्यवसाय असुरक्षित होणार आहे. स्थानिक प्रशासनाने आम्हा अश्वपालकांना विश्वासात न घेता शासनाकडून कडक निर्बंध लादले जात आहेत. आम्ही भूमिपुत्र म्हणून गावाच्या विकासासोबत राहिलो आहोत. ई-रिक्षामुळे ४६० घोड्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. ई-रिक्षाच्या चाचणीस विरोध असल्याचे अश्वपालकांनी निवेदनात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर

कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा

संबंधित अधिकाऱ्यांसह तहसीलदारांकडून पाहणी पोलादपूर : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या