Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाराष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगरला रौप्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगरला रौप्यपदक

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावले आहे. वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी प्रकारात त्याने ही कामगिरी केली. हे पदक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व शूर भारतीयांना सैनिकांना समर्पित करतो आहे, अशी प्रतिक्रिया संकेतने दिली आहे.

संकेतने पहिल्या फेरीत स्नॅच या प्रकारात ११३ किलोग्राम वजन उचलले. तर दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्कमध्ये १३५ किलोग्राम वजन उचलत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. मात्र, दुसऱ्या फेरीदरम्यान संकेत जखमी झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कै. मारुती माने यांच्या नंतर राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धेत सहभाग घेणारा संकेत हा सांगलीचा केवळ दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी १९७० मध्ये मारुती माने यांनी राष्ट्रकुल किडा स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. आज तब्बल ५२ वर्षांनी सांगलीच्या एका खेळाडूने राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेपर्यंत झेप घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -