ठाकरेंना धक्का; आमदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात

Share

परभणी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता राज्यभरातून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोल्यानंतर आता ३० वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या परभणीमध्ये उभी फूट पडली आहे. परभणी विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला, मात्र जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे दिसत आहे. प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे.

शिवसेनेत बंडखोरी करीत आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना आपल्या तंबूत घेण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. कोल्हापुरात माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर यांची नावे भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत. सांगली जिल्ह्यातील काही नेते भाजपच्या मार्गावर आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत मदत होईल, असे प्रमुख कार्यकर्ते हेरण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Recent Posts

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

12 seconds ago

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आदेश! सर्व राज्यांतल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा

अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

46 minutes ago

Eknath Shinde: पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या आदिलच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून आर्थिक मदत, घर देखील बांधून देणार

मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…

47 minutes ago

Mumbai Metro : मेट्रो-३ फेज २ ए मार्ग लवकरच होणार सुरू!

मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…

1 hour ago

मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बीएमसीकडून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…

1 hour ago

Shah Rukh Khan : पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत!

मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…

2 hours ago